आगामी तीन चार दिवसांत दक्षिण विदर्भात पावसाची शक्यता असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने सांगितलंय. गडचिरोली जिल्ह्यासाठी २० नोव्हेंबरला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. सध्या विदर्भात थंडी जाणवायला सुरवात झाली आहे पण मंगळवार पासून तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. यासंदर्भात प्रादेशिक हवामान खात्याचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी.