सोन्या-चांदीच्या दरात सतत घसरण होत असताना आज पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आहे. आज सोन्याचे दर 2 हजार रुपयांनी घसरून 1 लाख 34 हजार 500 रुपयांवर आले आहेत, तर चांदीच्या दरात तब्बल 8 हजार रुपयांची घसरण होऊन चांदीचे भाव 1 लाख 72 हजार रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. दिवाळीनंतर दरातील घसरणीचे सत्र कायम असून, जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोना चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांकडून देखील प्राधान्य दिले जात आहे. दरम्यान जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांचा कल अमेरिकन बाँडकडे वाढल्याने आणि औद्योगिक क्षेत्रातून चांदीची मागणी घटल्याने या दरांवर परिणाम होत असल्याची माहिती सराफा व्यावसायिकांनी दिली आहे.