Global News| Donald Trump-मीडिया वाद पेटला, ट्रम्प यांचा मीडियावर बहिष्कार,मीडियाचाही पलटवार

अमेरिकेत अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प आणि मीडिया हाऊस यांच्यातला वाद चांगलाच पेटला आहे. मीडियानं ट्रम्प यांनी बहिष्कृत करत असल्याचं सांगितल्यानंतर ट्रम्प यांनी पुढचं पाऊल टाकलंय. व्हाइट हाऊसने सोमवारी ‘ट्रम्प टीव्ही’ सुरू करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. हे एक डिजिटल प्रसारण नेटवर्क असेल, अशी माहिती जारी करण्यात आलीय. या नेटवर्कवर अमेरिकन प्रशासनाशी संबंधित कंटेंट २४ तास स्ट्रीम केला जाईल . यापूर्वी २०२२ मध्ये ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ हे स्वतःचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू केले आहे. ट्रम्प यांनी १८ सप्टेंबर रोजी CNN, MS NOW आणि पॉलिटिकोला व्हाइट हाऊसमधून बंदी घालण्याची घोषणा केली होती. या संस्था सातत्याने फेक न्यूज पसरवत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला होता. मात्र कोणत्या बातम्या खोट्या होत्या हे त्यांनी सांगितलं नाही.याचाच प्रतिकार करण्यासाठी या वृत्तसंस्थांनी व्हाईटहाऊसबाहेरून वार्तांकन करण्यास सुरुवात केली. तसंच टीव्ही नेटवर्क संघटनेनं ट्रम्प यांचं किंवा त्यांच्या कार्यक्रमांचं वार्तांकन किंवा प्रक्षेपण करण्यावर बहिष्कार घातलाय.

संबंधित व्हिडीओ