उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज NDTV मराठीच्या गणरायाचे दर्शन घेत आरती केली. यावेळी त्यांनी राज्यावरील दुष्काळाचे संकट दूर व्हावे आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, असे साकडे गणरायाला घातले. शेतकऱ्यांच्या पाठीशी महायुती सरकार ठामपणे उभे असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतः दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे त्यांनी सांगितले.