आयआयटी बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडेच्या वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. माझ्या मुलाला खूप टॉर्चर केलं होतं. त्याला जातीवाचक शिवीगाळ झाली असा गंभीर आरोप रविंद्र वाकोडेंनी केला आहे. आपल्या मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचाही आरोप वाकोडेंनी केलाय. या घटनेत शिरीष केदारे आणि प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांना अटक व्हावी अशी मागणी रविंद्र वाकोडे यांनी केलीय.