भारतात पूर्वेकडील राज्यांमध्ये सध्या पुरानं थैमान घातलंय. अनेक गावांना या पुरानं वेढा घातलाय. अशात पश्चिम बंगालमधला एक व्हिडिओ समोर आलाय. यात हत्तीचं एक पिल्लू पुरात अडकलं होतं. हे पाहून दोन मच्छिमार बोटीतून त्याच्यापर्यंत पोहोचले.आणि त्या पिल्लाला होडीवर ओढून घेत त्याचे जीव वाचवले. तिस्ता नदीला आलेल्या पुरात हे पिल्लू अडकलं होतं
बोटीवर येताच हे पिल्लू मच्छिमाराला अलगद बिलगलं. एकप्रकारे जीवदान देणाऱ्याप्रती त्यानं कृतज्ञताच जणू व्यक्त केली. मालबझार उपमंडळात आलेल्या पुरादरम्यान ही घटना घडली होती.
नंतर हे पिल्लू आपल्या आईला भेटतानाचा व्हिडिओ देखील समोर आलाय