Mumbai मध्ये इक्बाल मिर्ची प्रकरणात ED ची मोठी कारवाई; वरळीत 497 कोटींच्या तीन मालमत्ता जप्त

मुंबईत ईडीनं मोठी कारवाई केलीय.कुख्यात गुन्हेगार इक्बाल मिर्ची प्रकरणात सुमारे 700 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. वरळीतील रेबिया मॅन्शन, मरिअम लॉज, सी व्हूयसारख्या मालमत्तांसह दुबईतील कोट्यवधींची मालमत्ता जप्त केलीय. इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबीयांशी संबंधित मनी लॉन्डरिंग प्रकरणात ही मोठी कारवाई केली आहे.ही कारवाई फ्यूजिटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर्स अॅक्ट 2018 अंतर्गत करण्यात आली आहे.वरळीतील या तीनही मालमत्तांची किंमत सुमारे 497 कोटी इतकी आहे. तर दुबईतील मालमत्तेची किंमत 203 कोटी आहे.

संबंधित व्हिडीओ