Washim | Diesel साठी रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांच्या रांगा; डिझेलसाठी शेतकरी 4 ते 5 तास रांगेत उभे

वाशिम जिल्ह्यातील शेतकरी डिझेल टंचाईमुळे त्रस्त असून पंपावर रात्री उशिरापर्यंत डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या लांबच लांब रागा लागल्याचं बघायला मिळतंय. शेतकऱ्यांचा दिवसातील बहुतेक वेळ डिझेलची जुळवाजुळव करण्यातच जातोय. त्यामुळे शेती मशागतीची काम खोळंबली आहेत.आज सायंकाळच्या सुमारास वाशिम शहरातील काही पंपावर डिझेल उपलब्ध झालं होतं तिथं वाहन धारक आणि शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली. परिणामी चार ते पाच तास रांगेत राहूनही डिझेल मिळेल की नाही याची शाश्वती शेतकऱ्यांना नाहीये.

संबंधित व्हिडीओ