BMC | मुंबई महापालिकेत 'Cash for posting'; आमदार Mihir Kotecha यांची आयुक्तांकडे तक्रार

मुंबई महापालिकेतील कॅश फॉर पोस्टींग विरोधात भाजपमधूनच आक्रमक पवित्रा.बदली घोटाळ्यामागे असलेल्यांवर कारवाई करा- भाजप आमदार मिहीर कोटेचांची मागणी. या बदली घोटाळ्याची चौकशी करा- मिहीर कोटेचांची आयुक्त आश्विनी भीडेंकडे मागणी. मुख्यमंत्र्यांनी रोखलेल्या ५५ अधिका-यांच्या बदल्या पुन्हा त्याच जागी प्रस्तावित केल्यानं महापालिकेत खळबळ.गेल्या नोव्हेंबर महिन्यात महापालिकेतील १६१ अधिका-यांच्या बदल्यांच्या यादीत घोळ आढळल्यानं या बदल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या आदेशानंच रद्द करण्यात आल्या.मात्र बदल्यांची नवी यादी तयार करतांना ५५ अधिका-यांचे पोस्टींग मुख्यमंत्र्यांनी रद्द केलेल्या जून्या यादीप्रमाणेच करण्याचे प्रस्तावित केलेय.या ५५ अधिका-यांच्या बदल्यांमागे कॅश फॉर पोस्टींग- अर्थात बदल्यांसाठी कॅश स्विकारल्याचे आरोप मिहीर कोटेचांनी केलेत.

संबंधित व्हिडीओ