आजपासनं बारावीच्या परीक्षेला सुरुवात होतीये. अठरा मार्च पर्यंत ही परीक्षा चालणार आहे. राज्यभरातनं एकूण पंधरा लाख पाच हजार सदतीस विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. राज्यभरातील तीन हजार तीनशे त्र्याहत्तर मुख्य केंद्रांवरती परीक्षा घेण्यात येईल. कॉपी चे प्रकार रोखण्यासाठी संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरात जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन द्वारे परीक्षा केंद्रांवरती निगराणी ठेवण्यात येणार आहे. ग्राफिक च्या माध्यमातून पाहूयात. आज बारावीची परीक्षा आहे. कॉपी टाळण्यासाठी यंत्रणा अलर्ट झाली आहे. राज्यभरातील तीन हजार तीनशे त्र्याहत्तर मुख्य केंद्रांवरती ही परीक्षा पार पडेल.