मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांशी चर्चा केल्यानंतर कर्जमाफीचे आश्वासन पुन्हा दिले. मात्र, सध्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत देणे गरजेचे आहे, असे स्पष्ट केले. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही कर्जमाफी आवश्यक असल्याचे मत मांडले.