राज्यात आलेल्या पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत दिली जाईल, अशी ग्वाही कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. सरकारने शेतकरी बांधवांना आधार देण्याची आणि तातडीने नुकसान भरपाई देण्याची भूमिका स्पष्ट केली.