अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कामरगाव परिसरात कांदा चाळीत साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडून गेला आहे. शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीतून सावरण्यासाठी कांद्यावरील निर्यातबंदी त्वरित उठवण्याची मागणी केली आहे.