पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे.एकट्या जानेवारी महिन्यात पश्चिम विदर्भातील 80 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय. शेतमालाला हमीभाव नाही,कर्जबाजारीपणा, विविध कारणांमध्ये होत असलेली पिवळणूक त्यामुळे जानेवारी महिन्यात पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यात 80 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे.यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक 34 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय.अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मिळालीय.मागील वर्षी पश्चिम विदर्भात तब्बल 1 हजार 151 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या.यामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात 344 झाल्या होत्या.आता पुन्हा 2025 च्या सुरुवातीला शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याने चिंता व्यक्त केली जातं आहे.