गॅस टंचाईच्या झळा आता आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना देखील बसताना दिसत आहेत. सोलापूर जिल्ह्यात जवळपास 97 आश्रम शाळा आहेत. या आश्रम शाळातील 20000 विद्यार्थ्यांना गॅस टंचाईमुळे उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवासी विद्यार्थी असल्याने दोन वेळेचे जेवण तयार करण्यासाठी गॅस लागतो. मात्र एकच गॅस सिलिंडर असल्याने विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील 320 निवासी विद्यार्थी सध्या गॅसच्या प्रतीक्षेत असताना दिसून येत आहेत....परंतू गॅस तुटवडा झाल्यास त्यांच्यावर उपासमारिचे संकट उभं राहू शकतं...