Ratnagiri | गणपती विसर्जनावेळी बाप-लेक नदीत बुडाले, मुलाचा मृत्यू; संगमेश्वरमधील घटना
Father and son drown in river during Ganpati immersion; son dies – Incident in Sangameshwar
संगमेश्वर तालुक्यातील माभळे येथे गणपती विसर्जनावेळी दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. बावनदी पात्रात गणपती विसर्जन करताना पुरुषोत्तम घडशी आणि त्यांचा मुलगा प्रज्वल हे दोघेही पाण्यात बुडाले. या घटनेत पुरुषोत्तम घडशी यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं; मात्र प्रज्वल घडशी याचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी उशिरा ही घटना घडली. नदीपात्रात विसर्जन करताना पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही प्रवाहात वाहून जाऊ लागले. यानंतर ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू केलं. श्रीकांत घडशी यांनी नदीत उतरून पुरुषोत्तम यांना बाहेर काढलं, तर स्थानिक युवकांनी शोधमोहीम राबवत प्रज्वलला बाहेर काढले.