Ganeshotsav 2026| 22 फुटांची भव्य ‘शांतीनगरचा गजवक्र’ गणेशमूर्ती, तब्बल 32 फुटांची महालासारखी सजावट

मिरा-भाईंदरमधील शांतीनगर वेल्फेअर असोसिएशनचा यंदाचा गणेशोत्सव विशेष आकर्षण ठरत आहे. १९८७ साली स्थापना झालेल्या, या मंडळाचा यंदा ४० वा गणेशोत्सव आहे, ‘शांतीनगरचा गजवक्र’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणरायाची तब्बल २२ फुटांची भव्य मूर्ती विराजमान करण्यात आली आहे.गणपती बाप्पासाठी तब्बल ३२ फुटांची महालासारखी आकर्षक सजावट उभारण्यात आली आहे... भव्य देखाव्यासोबतच करण्यात आलेली रंगीत विद्युत रोषणाई यामुळे संपूर्ण शांतीनगर परिसर उजळून निघालाय.. गणेशोत्सवाचे हे दृश्य नागरिकांचे लक्ष वेधून, घेत आहे.

संबंधित व्हिडीओ