भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणी अपडेट समोर येतेय...माजी आमदार नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलीस शैलेश पाटील यांना शोधण्यासाठी पडघा पोलिसांचे तीन पथकं रवाना झालीयेत... माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासोबत आरोपी शैलेश पाटीलविरोधात यापूर्वीही गंभीर गुन्हे आहेत... स्वतःच्या सख्ख्या आईला पिस्तूलाचा धाक दाखवल्याचा आरोप शैलेश पाटीलवर आहे... तसंच 2014 मध्ये परदेशी महिलेच्या फसवणूक-विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता,सध्याच्या बलात्काराच्या गुन्ह्यानंतर दोन्ही आरोपी फरार असून पोलिसांचा शोध सुरू आहे