अमेरिकेनं भारत आणि पाकिस्तानला जबाबदारीने तोडगा काढण्याचे आवाहन केलंय.जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारत युद्धासाठी सज्ज झाला आहे. पाकिस्तानकडूनही हालचाली सुरू असून सीमेवर रणगाडे तैनात केले आहेत. यापार्श्वभूमीवर अमेरिकेने भारत आणि पाकिस्तानला तोडगा काढण्याचे आवाहन करत भारताला पाठिंबा दर्शविला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटले आहे की, दोन्ही सरकारांच्या आम्ही संपर्कात आहोत. ही एक बदलणारी परिस्थिती आहे आणि आम्ही घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत, असे परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. त्यांनी अमेरिकेने हल्ल्याचा निषेध केल्याचे सांगितले. तसेच अमेरिका भारतासोबत उभी आहे, या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी दिलेल्या पाठिंब्याचा पुनरुच्चार केला.