नाशिक जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर असल्याचे समोर आलंय.दिड वर्षांच्या माहेश्वरी कांबळे मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय.नाशिकच्या चुंचाळे पोलीसांकडे प्राप्त झाले दोन अहवाल आलेयत.नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाने उपचारात हलगर्जीपणा झाल्याचा अहवाल दिला होता. त्यापाठोपाठ नाशिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने दिला हलगर्जीपणा झाला नसल्याचा अहवाल दिलाय.योग्य ईलाज करून देखिल माहेश्वरीने उपचाराला प्रतिसाद दिला नाही आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा शासकीय महाविद्यालयाच्या अहवालात नमूद करण्यात आलंय.