तिकडे चीननं त्याचा मित्र पाकिस्तानची बाजू घेत नवी खेळी खेळलीए.पाकिस्तानला सुरक्षेबाबत सतावणाऱ्या चिंता आम्ही समोजतो असं चीननं म्हटलंय.शिवाया भारत आणि पाकिस्तानला संयम बाळगण्याचा सल्लाही चीननं दिलाय. दुसरीकडे चीननं पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढत असताना चीनने पाकिस्तानला मोठा शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला आहे.यामध्ये चीनने 10 हून अधिक PL-15 लॉंग Range Air-to-Air Missile ची क्षेपणास्त्रे दिली आहेत. या तणावाच्या काळात पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री आणि चिनी राजदूतांची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चीनचे आभारही मानले.