भारताने कितीही मदत केली तरी तुर्कस्तान हा पाकिस्तानच्याच बाजुने उभा ठाकला आहे. भारताविरोधात लढण्यासाठी तुर्कीने पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर लष्करी शस्त्रसामुग्री पाठविली आहे.तुर्कीच्या लष्कराचे एअर फोर्स सी १३० हे मालवाहू हर्क्युलिस विमान रविवारी कराची विमानतळावर उतरले आहे. या विमानामध्ये तुर्कीचा धोकादायक ड्रोन बायरकतार आणि अन्य शस्त्रास्त्रे आहेत. भारताविरोधात लढण्यासाठी तुर्की पाकिस्तानला मोठी लष्करी मदत करत आहे. या दोन्ही देशांनी एकमेकांना लष्करी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार ही मदत केली जात आहे.