गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही तास शिल्लक असताना नागपूरच्या चितार ओळ परिसरात गणेशोत्सवाची धामधूम शिगेला पोहोचली आहे... गणेशोत्सवासाठी लागणारे डेकोरेशन साहित्य, मखर, रोषणाई आणि पूजासाहित्य खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने बाजारपेठेत दाखल होत आहेत... सर्व दुकाने विविध आकर्षक वस्तूंनी सजली असून गणरायाच्या स्वागतासाठी नागपूरकरांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे...