राज्यभरात गणेशोत्सवाची लगबग सुरु झालीय. त्यामुळे खरेदीसाठी दादर मार्केटमध्येही मोठी गर्दी दिसली. मुंबईत आज हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला असतानाच गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी मुंबईकर घराबाहेर पडले आहेत. सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असतानाही दादरच्या मार्केट परिसरात नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. बाप्पाच्या आगमनासाठी फुले, सजावटीच्या वस्तू आणि पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू असून पावसावर भक्ती आणि उत्साह मात करत असल्याचे चित्र मुंबईत दिसत आहे.
Ganeshotsav 2026 | Mumbaikars out shopping despite heavy rain; NDTV Marathi LIVE from Dadar market.