Girish Mahajan On Manoj Jarange | मनोज जरांगे यांनी आंदोलनाची वेळ टाळावी, गिरीश महाजन यांचं आवाहन
Girish Mahajan appeals to Manoj Jarange to avoid the timing of the agitation.
मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलणे चालले आहे.प्रयत्न सुरु आहे.गणेशोत्सव मोठा गर्दीचा उत्सव आहे, महिला मुले सर्व रस्त्यावर असतात. मुंबईत आंदोलनासाठी वेळ त्यांनी टाळली पाहिजे.त्यांना अधिकार आहे उपोषण करण्याचा आंदोलन करण्याचा, मोर्चा काढण्याचा.ही वेळ काही योग्य नाही.. त्यांनी अजूनही विचार करावा असे आवाहन नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जरांगे पाटील यांच्या 15 सप्टेंबर पासून मुंबईत होणाऱ्या आंदोलनाबाबत केले. मालेगावच्या कळवाडी येथे आयोजित आदिवासी मेळाव्यानंतर माध्यमांशी बोलताना हे आवाहन केले.