सतत शरद पवारांवर टीकेची राळ उठवणारे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी चक्क शरद पवारांचं कौतुक केलंय. शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून पडळकरांनी पवारांचं कौतुक केलं. शरद पवार कधी कधी चांगली भूमिका घेतात असं म्हणत शक्तिपीठाच्या बाबतीत पवारांनी घेतलेल्या भूमिकेचं त्यांनी कौतुक केलं.