संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यातलं पहिलं उभं रिंगण आज तरडगाव येथे पार पडलं चांदोबाचा लिंब या ठिकाणी. अतिशय नयनरम्य असा हा सोहळा होता. यंदा हे रिंगण मंदिरापासून तब्बल अर्धा किलोमीटर पुढे झालं यामागचं कारण म्हणजे दिंड्यांमध्ये पडलेलं मोठं अंतर. हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत विठूनामाच्या गजरात जयघोषात पारंपारिक उभ्या रिंगणासाठी ठरलेल्या जागांपेक्षा जास्त लांब रिंगण घेण्यात आलं.