जवळपास अर्ध्या महाराष्ट्रातला शेतकरी आज संकटात आहे.शेतकऱ्यावर ज्यावेळी अचानक अस्मानी संकट येतं.त्यावेळी त्या संकटातून सावरण्यासाठी अनेक शेतकऱ्यांची भिस्त असते ती पीकविम्यावर.. एक रुपयात पीक विमा अशी योजना सरकारनं सुरू केली होती. मात्र काही काळापूर्वी ही योजना बंद झाली.... आणि त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. योजना रद्द झाली, त्यातच पीकविम्याचे निकषही बदलले.. त्यामुळे शेतकऱ्यांना नको को पीकविमा असं म्हणण्याची वेळ आलीय... पाहुया पीकविमा योजना महाराष्ट्रात कशी कुचकामी ठरलीय..