भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांनी कोल्हापूरच्या इचलकरंजी लोकसभा मतदार संघाची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरची केली आहे. धैर्यशील माने यांनी पाकव्याप्त काश्मीर सारख्या इचलकरंजी मधून विजयाचा दिवा लावला असं वादग्रस्त विधान सांगलीच्या वाळवा इथे केलंय.