Hingoli| दुष्काळामुळे सगळं पीक करपलं, कर्जमाफी जाहीर, अद्याप मदत नाही; याचसंदर्भात शेतकऱ्यांशी संवाद

पावसाअभावी शेतातलं उभं पिक करपलंय... संसाराचा गाडा कसा चालवायचा, असा सवाल हिंगोलीतील शेतकऱ्यांसमोर उभा आहे...सरकारने कर्जमाफी केली, दुष्काळ जाहीर केला... मात्र दुष्काळाची प्रत्यक्ष मदत अद्याप जाहीर झालेली नाही.. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एक लाख रुपये हेक्टरी मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे... दरम्यान यासंदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी.

संबंधित व्हिडीओ