राऊतांनी तोंड काळं करायला तयार राहावं, Sanjay Raut यांच्या आरोपांवर Nitesh Rane यांचं उत्तर

खासदार संजय राऊतांनी आज नवीन गौप्यस्फोट केला. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात आरोप-प्रत्यारोपाचा नवीन सामना रंगण्याची शक्यता आहे.”सिंधूदुर्गातील वेंगुर्ला, सावंतवाडी, दोड मार्ग या भागातली 900 कोटीची शेतजमीन, कृषी जमीन ही बंगळुरु, दिल्ली आणि हैदराबाद मधल्या श्रीमंतांना बेकायदेशीर मार्गाने विकण्यात आली. जे शेतकरी नाहीत त्यांना ही जमीन विकण्यात आली” असा आरोप संजय राऊतांनी केला आहे...कोकणातले सिंधुदुर्गातील मंत्रिमंडळातील नेते काय करतात त्यांचे पार्टनर कोण आहेत असा सवाल संजय राऊतांनी केलाय. संजय राऊतांच्या आरोपांवर मंत्री नितेश राणे यांनीही उत्तर दिलंय.. या प्रकरणाची चौकशी सुरू असून कोकण आयुक्त अहवाल सादर करतील तेव्हा राऊतांनी तोंड काळं करायला तयार राहावं असं नितेश राणेंनी म्हटलंय..

संबंधित व्हिडीओ