Nashik| मालेगावात भेळ खाल्ल्यानं 50 हून अधिक जणांना विषबाधा, Dada Bhuse रुग्णांच्या भेटीसाठी दाखल

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथे भेळ खाल्ल्यानंतर 50 हून अधिक जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. आठवडे बाजारातील भेळ खाल्ल्यानंतर अनेक नागरिकांना मळमळ, उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने त्यांना तातडीने मालेगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. अचानक मोठ्या संख्येने रुग्ण वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण झाला असून खासगी डॉक्टरही मदतीसाठी पुढे आले आहेत.

संबंधित व्हिडीओ