धाराशिवमध्ये कीर्तन करण्याच्या कारणावरून पांडुरंग धंगेकर, राहुल येलकर या दोन महाराजांमध्ये हाणामारीची घटना घडली आहे. मारहाण करणाऱ्या महाराजा विरोधात गुन्हा दाखल होत नसल्याने हा वाद चिघळला. धाराशिवच्या येडशी येथील महाराजांनी बाल वारकऱ्यांना सोबत घेत सोलापूर छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान एका बाल वारकऱ्याला भोवळही आली.