Election Commission विरोधात Congress चे दिल्लीत आंदोलन, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी

केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेस पक्षाने आज दिल्लीतील दीन दयाल उपाध्याय मार्गावर जोरदार आंदोलन केले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, संतप्त कार्यकर्त्यांनी पोलीस बॅरिकेड्स तोडत आपल्या मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेतला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना तातडीने ताब्यात घेतले. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या संपूर्ण घडामोडींचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी.

संबंधित व्हिडीओ