Rohit Pawar यांनी आरोप केलेला 'तो' मफलरवाला नेता कोण? आरोपावर Shashikant Shinde म्हणाले...

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणात व्हिएसआर कंपनीला एक नेता वाचवत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. मफलर घालणारा हा नेता असून येत्या 10 ऑक्टोबरला नेत्याचं नाव जाहीर करून पर्दाफाश करण्याचा इशाराच आमदार रोहित पवार यांनी दिलाय. त्यामुळे मफलरवाला हा नेता कोण? याचं गूढ वाढलं आहे.रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अजितदादांच्या अपघाती निधनावर मोठा गौप्यस्फोट केला आहे. दादांना जाऊन आठ महिने झाले आहेत. सरकार हातावर हात ठेवून बसल्याचा आरोपही रोहित पवारांनी केलाय. यावर बोलताना त्यांनी अपघातासंदर्भात प्रश्न विचारण्यासाठी जय पवारांनी सोबत यावं असही सांगिलंय. मफलर मॅन कोण मला माहिती नाही मी त्यांच्याशी चर्चा करेन आणि मग माहिती मिळाली की बोलेन, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी दिलीय.

संबंधित व्हिडीओ