बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची आज 71 वी वार्षिक सर्वसाधारण सभा होती, कारखान्याचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडत आहे. दरम्यान भाषण करताना एका सभासदाने विविध आरोप केले त्यावर उपाध्यक्षाने ज्याच्यावर आरोप त्या कर्मचाऱ्याला बोलू दिले नाही. यानंतर सभासद देखील आक्रमक झाले आणि सभेतील सर्व विषय मंजूर मंजूर मंजूर अशा पद्धतीने एकच गोंधळ घातला. सुनेत्रा पवारांनी चेअरमन या नात्याने मध्यस्थी करत हा सर्व गोंधळ शांत केला आणि पुन्हा सभा सुरू झाली.