मालेगाव तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथील विषबाधा प्रकरण अधिकच गंभीर बनत असून बाधितांची संख्या आता 150 च्या पुढे पोहोचली आहे.आठवडे बाजारातील भेळ खाल्ल्यानंतर अनेक नागरिकांना मळमळ, उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने त्यांना तातडीने मालेगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. अचानक मोठ्या संख्येने रुग्ण वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण झाला असून खासगी डॉक्टरही मदतीसाठी पुढे आले आहेत.
Nashik | Malegawat, 150 more people died in the market during the week due to poisoning, latest updates about this.