राज्यातील सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर डीजे आणि डॉल्बीच्या वापराबाबत राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करत मोठा निर्णय जाहीर केला आहे. डॉल्बी आणि डीजेच्या अति आवाजाला विरोध करणाऱ्या नागरिकांच्या भूमिकेशी सरकार पूर्णपणे सहमत असून,आता केवळ 4 बेस आणि 4 स्पीकर वापरण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.. याबाबत स्पष्टीकरण देताना मंत्री उदय सामंत म्हणाले,डॉल्बी ही एक साऊंड सिस्टीम आहे,तर डीजे ही ती चालवणारी व्यक्ती आहे.या सिस्टीममधून निघणारा कानठळ्या बसवणारा अतिप्रचंड आवाज येऊ नये,हीच सर्वांची मागणी होती.जनभावना लक्षात घेऊन सरकारने आवाजावर नियंत्रणठेवण्यासाठी 4 बेस आणि 4 स्पीकरचा मर्यादित नियम लागू केला असल्याचे स्पष्टीकरण मंत्री उदय सामंत यांनी केला आहे..