उज्जैनमध्ये सुरू असलेल्या रस्ते रुंदीकरण प्रकल्पात उभ्या मारूती मंदिराचा अडसर निर्माण झाला आहे. मंदिरातील मूर्ती हलविण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले मात्र ही मूर्ती जागची तसूभरही हलत नाहीये. क्रेन लावल्यानंतरही ही मूर्ती जागची हलली नाहीये. ही मूर्ती जमिनीत खोलवर स्थापन झाल्याने ती हलत नसावी असा अंदाज आहे. यामुळे ही मूर्ती किती खोल आहे याचा अंदाज बांधण्यासाठी IIT इंदूरची मदत घेतली जाणार आहे. इंदूर महापालिकेने ही मदत मागितली आहे.