माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा अखेर रात्री सुखरूप परतला. मुलगा न सांगताच गेल्यावर तानाजी सावंतांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ या सगळ्यांना फोन लावून यंत्रणा कामाला लावली होती. तानाजी सावंत यांचा मुलगा त्याच्या दोन मित्रांसोबत बँकॉकला निघाला होता अशी माहिती मिळाली. अडुसष्ठ लाख रुपये खर्चून तानाजी सावंतांचा मुलगा बँकॉकला निघाला होता खरा मात्र हे विमान अंदमान निकोबार पर्यंत गेलेलं असतानाच पुन्हा माघारी बोलावलं आणि चेन्नईला ते लँड करण्यात आलं आणि तिथनं त्याला पुण्यात बोलावण्यात आलं. रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान ऋषराज सावंत हा पुण्यामध्ये दाखल झाला आणि त्याच्यासोबत त्याचे दोन मित्रही होते.