इंडिया आघाडीच्या खासदारांनी निवडणूक आयोगाच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी खासदार बसने आयोगाच्या मुख्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. पोलिसांकडून ज्या ठिकाणी त्यांना अडवले जाईल, त्या ठिकाणीच ते आंदोलन आणि निदर्शने करतील.दरम्यान, आंदोलनासाठी जंतर-मंतर हेही संभाव्य ठिकाण मानले जात आहे. काँग्रेस पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना जंतर-मंतर येथे मोठ्या संख्येने जमण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत इंडिया आघाडी आणि काँग्रेसकडून मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू असल्याचे चित्र आहे. INDIA आघाडीचा मोर्चा जंतरमंतरच्या दिशेनं मोर्चावरुन काँग्रेस आमदार सतेज पाटील- भाजप खासदार अनिल बोंडे यांच्यात जुंपली.