पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर निर्बंध घातले. उत्तरादाखल पाकिस्तानने देखील भारतासोबतचा व्यापार थांबवण्याचा निर्णय घेतला होता.मात्र हा निर्णय पाकिस्तानच्याच अंगाशी आला असल्याचं चित्र सध्या निर्माण झालंय. पाकिस्तान सध्या औषध टंचाईच्या उंबरठ्यावर आलाय. कारण पाकिस्तानी औषधांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा भारताकडून होत होता. आता भारताकडून येणारा कच्चा माल बंद झाल्याने पाकिस्तानात लवकरच औषधांची टंचाई सुरु झालीय. व्यापार बंद करुन पाकिस्तानने स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतल्याचं दिसतंय. आता पर्याय म्हणून चीन आणि रशिया सारख्या देशांकडे पाकिस्तानने हात पसरलेत.