मुंबई पोलिसांनी सम रैना रणवीर अलाहाबाद याला फोन वरून चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिलेत. इंडियाज गोट लेटेंट वाद प्रकरणामध्ये सहकार्य करण्यासाठी आणि आपली बाजू मांडण्यासाठी पोलिसांनी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. दुसरीकडे रणवीर अलाहाबाद याचा वादग्रस्त व्हिडिओ यूट्यूब वरनं हटवण्यात आलाय. व्हिडिओ हटवण्याबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं नोटीस पाठवली होती. त्यानंतर तो आता काढण्यात आलेला आहे. या व्हिडिओ वरून बरीच टीका झालेली होती. भाषेचं तारतम्य न बाळगणं यावरूनही आणि अश्लीलतेचा कळस गाठल्यावरूनही जोरदार टीका होत होती. समना रणवीर अलाहाबाद याला आता चौकशीला येण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. पोलिसांनी फोन करून चौकशीला या असं सांगण्यात आलेलं आहे.