India Weather Forecast| उत्तराखंड, शिमला, हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचं हाहाकार; अनेक ठिकाणी बचावकार्य

उत्तराखंडच्या डबरीत मोठं भूस्खलन झालं आहे. शेकडो लोक भूस्खलनामुळे अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भूस्खलन हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. सततच्या पावसामुळे मलबा हटवण्यात अडचणी निर्माण होत आहेत. तर शिमला येथील कोटखाईमधील खलटू नाला उलटलायने मोठा फटका वाहनांना बसलाय. कोकुनाला पुलाला मुसळधार पावसामुळे आणि मलबा वाहत आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सुमारे डझनभर वाहनं मलब्याखाली दबली गेलीत.कोकुनाला जवळील राष्ट्रीय महामार्गावर मलबा आल्याने कोटखाई-ठियोग एनएच-22 बंद झाला आहे. शिमला येथील रामपूरमध्ये ढगफुटीच्या घटनेनंतर गानवी बाजार आणि आसपासच्या गावांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ढगफुटीमुळे संपूर्ण परिसरात पूराने हाहाकार माजवला आहे. काही घरे पुराच्या पाण्याखाली गेलेत.. दोन छोटे पूल वाहून गेलेत. वीज मंडळाचे कार्यालय आणि पोलिस चौकीचेही नुकसान झाले आहे.बाजाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रशासनाने तो परिसर रिकामा केला आहे आणि सर्वांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यातील पूह येथे ढगफुटीमुळे मोठा पूर आला. कन्स्ट्रक्शन कंपनीची यंत्रसामग्री वाहून गेली आहे. पूराचे पाणी रामपुर बुशहरपर्यंत पोहोचले आहे.

संबंधित व्हिडीओ