IRB कंपनीच्या महसुलात टोलवसुलीमुळे मोठी वाढ, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महसूल 807 कोटींवर

IRB Group च्या टोल महसुलात यंदा मोठी वाढ झाली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2026 मध्ये टोलमधून मिळणारा महसूल 25% नी वाढून ₹807 कोटींवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट 2025 मध्ये कंपनीचा टोल महसूल ₹646 कोटी होता. टोलदरवाढीचाही महसुलवाढीस फायदा झाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. या महसुलातील सर्वाधिक वाटा हा जुन्या आणि नव्या मुंबई-पुणे महामार्गावरील टोलवसुलीचा आहे. या टोलनाक्यांमुळे कंपनीच्या महसुलात 172.1 कोटींची भर पडली. गेल्या वर्षी याच कालावधीत हा महसूल ₹144.7 कोटी होता.

संबंधित व्हिडीओ