राज्यातील राजकारणात आणखी एक भूकंप होण्याची शक्यता आहे.शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस NDAत सामील होऊ शकते, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय.पक्षाने बाहेरुन पाठिंबा द्यावा की सत्तेत जावं याबाबत सध्या चाचपणी सुरु असल्याची सुत्रांनी माहिती दिलीय. राशपच्या एका बड्या नेत्यावर याबाब चाचपणी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती मिळतेय. तर एनडीएसोबत जाण्यासाठीच्या अटीही ठरल्याचं समजतंय.