Mumbai| मायक्रो लेव्हलवर काम कमी पडलं, उघड्या मॅनहोलच्या धोक्यावर महापालिकेची मोठी कबुली

मुंबईत प्रत्येक पावसाळ्यात उघडे मॅनहोल नागरिकांच्या जीवावर बेतत असताना, आता मुंबई महापालिका प्रशासनाने या प्रश्नावर मोठी कबुली दिली आहे. तब्बल एक लाखांहून अधिक मॅनहोल असलेल्या मुंबईत गेल्या चार वर्षांपासून व्यवस्थापनासाठी काम सुरू असलं, तरी मायक्रो लेव्हलवर अपेक्षित अंमलबजावणी झाली नसल्याचं महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मान्य केलं आहे.

संबंधित व्हिडीओ