दानापूर-सिकंदराबाद एक्सप्रेसमध्ये महिलांचा विनयभंग,आरक्षित डब्यात विनातिकीट प्रवाशांकडून त्रास

नागपूरमध्ये महिलांच्या रेल्वे प्रवासाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना घडलीय.दानापूर–सिकंदराबाद एक्सप्रेसमध्ये महिलांचं विनयभंग, छेडछाड केल्याचा आरोप करण्यात येतोय. नागपुरातील कुटुंब देवदर्शनाहून उत्तर प्रदेश येथून परत येताना दानापूर–सिकंदराबाद एक्सप्रेसमध्ये बसले... मात्र यात प्रवासी महिलांना विनयभंग, छेडछाड आणि अश्लील वर्तनाचा सामना करावा लागला.. आरक्षित डब्यात असतांना शेकडो लोक अश्या पद्धतीने घुसल्याने प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला... त्याचबरोबर तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचं सांगण्यात आलंय.

संबंधित व्हिडीओ