जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आलेत., या धरणातून तापी नदीपात्रात 25 हजार 74 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यासह विदर्भात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. आवक आणखी वाढल्यास धरणातून विसर्गही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Jalgaon | 10 gates of Hatnur Dam opened; 25,074 cusecs of water released from the dam into the Tapi riverbed.