Jalgaon| Manoj Jarangeयांच्या समर्थनार्थ मराठा बांधवांचं आंदोलन, चाळीसगावमध्ये सकल मराठा समाज आक्रमक

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. शहरातील न्यायालयाजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून मराठा बांधवांनी आंदोलन सुरू केले असून घोषणाबाजी करत त्यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. शासनाने मराठा समाजाच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. विशेष म्हणजे या आंदोलनात महिलांनीही सहभाग घेत पाण्याच्या टाकीवर चढून निषेध नोंदवला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. Jalgaon | Maratha community members protest in support of Manoj Jarange; 'Sakal Maratha Samaj' takes an aggressive stance in Chalisgaon.

संबंधित व्हिडीओ